रिपाईंचा गुरुवारी मुंबईत मेळावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( आठवले)च्या मुंबई प्रदेशचा मेळावा गुरुवारी दुपारी 4 वाजता वरळीतील हाजी अली दर्ग्यासमोर  सरदार वल्लभाई पटेल स्टेडियम; एनएससीआय क्लब च्या डोम हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. रिपाइंच्या या भव्य मेळाव्यातून महायुतीतर्फे आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार  असल्याची चर्चा आहे. या रिपाइंच्या  भव्य मेळाव्यास मुंबईतील रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन या मेळाव्याचे आयोजक रिपाइं मुंबई प्रदेशचे  अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केले आहे.