
अमेरिकेच्या नेवार्कहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियातील एका प्रवाशी अचानक हिंसक झाला आणि सहप्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. विमान हवेत असताना मुंबईत राहणारा हा व्यक्ती अचानक किंचाळायला लागला. एवढेच नाही तर त्याने आपल्या पत्नीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, क्रू मेंबर्सनी विमानातील डॉक्टरांच्या मदतीने परिस्थिती हाताळली आणि त्यानंतर असा खुलासा झाला.
न्यू जर्सीहून विमानाने टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या तीन तासांनी त्या व्यक्तीने वैमानिकाला विमान लॅण्ड करण्यासाठी सांगितले. त्यानंतर तो अचानक हिंसक झाला आणि ओरडायला लागला. क्रू मेंबर्सने प्रवास करणाऱ्या काही डॉक्टरांच्या मदतीने त्याला शांत केले. प्रवीण टोनसेकर नावाच्या एका सहप्रवाशाने सांगितले की, जेव्हा क्रू ने डॉक्टरांची मदत घेण्यापूर्वी परिस्थिती हाताबाहेर गेली होती. त्यांनी सांगितले की. तो किंचाळत होता, शिवीगाळ करत होता आणि अनेकदा त्याने आपल्या पत्नीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. क्रू मेंबर्सने त्याला सांभाळले आणि डॉक्टरांनी त्याला इंजेक्शन देऊन बेशु्दध केले. त्यानंतर त्याला एन्झायटी अटॅक आल्याचे निदर्शनात आले. क्रू मेंबर्समुळेच त्यांना नियंत्रणात आणता आल्याने त्यांचा सन्मान करण्याचे आवाहन केले आहे.
एअर इंडियानेही त्यांचे आभार मानले आहेत. एअरलाइन्सने लिहिले की, ‘आम्हाला आनंद आहे की, आमची टीम समर्थपणे प्रवाशाला साथ देऊ शकली. आमच्या क्रूला व्यापक प्रशिक्षण दिले जाते. आमचे प्रयत्न ओळखल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. प्रवीण सांगतात की, लोकांनी 7-8 तासांनंतरच सुटकेचा नि:श्वास टाकला. दरम्यान, गुरुवारी विमान योग्य वेळी मुंबईत दाखल झाले.


























































