मुंबई विमानतळावर प्रवाशांची रखडपट्टी

बईहून बंगळुरूला जाणाऱ्या विमानाच्या उड्डाणाला आधीच अर्धा तास उशीर झाला असताना अचानक सुरू झालेल्या तपासणीमुळे रात्री उशिरापर्यंत रखडले. विशेष म्हणजे विमानतळ प्रशासनाकडून प्रवाशांना तपासणीबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याने प्रचंड संताप निर्माण झाला. प्रवाशांना गाडीत बसवून ताटकळत ठेवल्याने लहान मुले, ज्येष्ठांचे हाल झाले.

मुंबई-बंगळुरूला जाणारे सायंकाळी 6.10 वाजताच्या अकासा कंपनीच्या विमानाला उड्डाणाला आधीच अर्धा तास उशीर झाला होता. यातच विमान उड्डाणाला तयार असताना अचानक सर्व प्रवाशांना अचानक उतरवण्यात आले. सर्व प्रवाशांचे सामानही विमानाबाहेर काढण्यात आले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सुरुवातीला प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे तपासणी कर्मचाऱ्यांना प्रवाशांना या प्रकाराबद्दल विचारण्यास सुरुवात केली. मात्र त्यांच्याकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. सुरुवातीला सर्व प्रवाशांना विमानतळावरच बसवून ठेवण्यात आले. यानंतर या ठिकाणी डॉगस्कॉडही दाखल झाले. शिवाय स्पॅनरच्या माध्यमातूनही सामानाची चेकिंग करण्यात आली. यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता.