
सामना प्रतिनिधी । पाथर्डी
पाथर्डी येथील करंजी येथे काल रात्री अज्ञात दरोडेखोरांनी संजय अकोलकर व त्यांच्या पत्नी सविता अकोलकर यांना गजाने मारहाण करत तीन तोळे सोने व 40 हजार रुपयांची रोकड चोरून नेली आहे.
नगर जिल्ह्यामध्ये सध्या दरोड्याचे प्रकार वाढत चालले आहेत. त्यातच पाथर्डी तालुक्यामध्ये करंजी येथे काल रात्री अज्ञात दरोडेखोरांनी पती-पत्नीला जबरदस्त महारण केल्याची घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे. तसेच सोन्या-चांदीचे दागिने रोख रक्कम असा 40 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. दरम्यान, पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
























































