पाथर्डीमध्ये घडले एकतेचे दर्शन, मुस्लिम दाम्पत्याच्या हस्ते गणपतीची आरती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आगळे वेगळे उपक्रम सातत्याने राबवणाऱ्या येथील सुवर्णयुग तरुण मंडळाने गणपतीची आरती मुस्लिम दाम्पत्याच्या हस्ते करत हिंदू मुस्लिम ऐक्याचा नारा दिला.वर्षभर विविध उपक्रम राबवणारे मंडळ म्हणून तालुक्यात सुवर्णयुगची ख्याती आहे. वृक्षलागवड करणे,उन्ह्याळ्यात प्राण्यांसाठी पाणवठे तयार करणे,आरोग्य शिबिरे राबवणे तसेच देखाव्याच्या माध्यमातून समाजजागृती करणे असे विविध उपक्रम सुवर्णयुग तरुण मंडळ राबवत असून कोरोना लाटेत अनेकांना किराणा देण्याचे कामही या मंडळाने केले आहे तर या मंडळाने सादर केलेल्या अनेक देखाव्यांना राज्यशासनाचे राज्यस्तरीय पारितोषिक सुद्धा मिळालेले आहे. विशेष म्हणजे मंडळाचे अनेक मुस्लिम युवक सदस्य सुद्धा असून या वर्षी मंडळाने प्रथमच मंडळाचे मुस्लिम सदस्य शाहरुख शेख व त्यांच्या पत्नी कौसर शेख यांच्या हस्ते गणपतीची पूजा व आरती केली.या मंडळाचे पदाधिकारी राजेंद्र शेवाळे,वैभव शेवाळे,अमोल कांकरिया,मुकुंद लोहिया,भैय्या गांधी,ओम डागा यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. मंडळाने रावबवलेल्या या उपक्रमाचे सर्व सरातून स्वागत होत आहे.