आयआयटीच्या विद्यार्थांचा अनोखा उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पाटणा

आयआयटी ही संस्था नेहमीच वेगवेगळे शोध, उपक्रम राबवत असते. पटणा येथील आयआयटीच्या मुलांनी सध्याच्या धकाधकीच्या, गर्दीच्या, महागाईच्या जमान्यावर एक उत्तम उपाय म्हणून सायकल बनवली आहे.

ही सायकल कमीतकमी १५० किलो वजन उचलू शकते. ह्या सायकलचा स्पीड प्रती किमी २५ ते ३० अशी आहे. विशेष म्हणजे ट्रॅफिकच्या वेळी, लहान रस्त्यांमधून ही सायकल सहजरित्या निघू शकते. या सायकलच्या पेटंटसाठी आयआयटीने निवेदन केले आहे, असे इलेक्ट्रिकल विभागाचे अध्यक्ष डॉ. आरके बेहरा यांनी सांगितले. या सायकलची साधारण किंमत १० ते १२ हजार रुपये आहे, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.