दत्तभक्तांची पंढरी श्री क्षेत्र पवनी

>> निळकंठ कुलकर्णी

।। श्री गुरुदेव दत्त ।।

“पवित्र भूमी असेही दत्तभक्तांची पंढरी वसतीला असती येथे वासुदेवानंद सरस्वती, निमित्ये दर्शनाचे करून जाऊ या पावन स्थळी”

पवनी हे नागपूरपासून फक्त 50 मैलांवर (कि. मी) वैनगंगा नदीच्या तीरावर बसलेले हे ठिकाण पुराणात याला पद्मावतीपुरी असेही म्हणतात. काही शतकापूर्वी येथे पावन नावाचा राजा होऊन गेला म्हणून या नगरीला पवनी असे म्हणतात. 60 ते 70 वैदिक ब्राह्मण, वेदघोष करणारे ब्राह्मण येथेच सापडत.

नागपूरच्या अग्नेय दिशेस निघून उमरेड भिवापूर ओलांडून दाट झाडीतून मार्ग काढून पुढे जाताच उंच दणकट किल्ला व त्यावरील बुरुज दिसायला लागतात. दगडी सिंहद्वारातून गावात प्रवेश होतो रे रेशमी, जरीकाठी उपरणे , लुगडी, विड्याची पानांचे मळेही येथे भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे हे गाव सुशोभित झाले आहे, प्रसिद्धीस आले आहे.

भरपूर देवालये, नदीवरील घाट, वज्रेश्वराचे शिवमंदिर, दत्तमंदिर, मुरलीधर मंदिर नदीवर काठी आहे. मुरलीधर मंदिराच्या लागूनच खाली उरतरले की, एक फूट उंचीची 9-10 गणेशाची रेखीव मूर्ती आहे. मुरलीधरच्या गच्चीवरून वैगंगगेचे विस्तीर्ण पात्र व नयनरम्य परिसर बघून वेगळाच आनंद होतो. तीनही बाजूंनी 6 मैल लांबीच्या डोंगरवजा टेकड्यांनी वेढलेला व थोर साधुसंतांच्या वास्तव्याने नितांत पूनीत झालेल्या विदर्भात पवनी शिवाय कुठेच बघायला मिळत नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लहानपणी येथे बरेच दिवस वास्तव्यास होते.

अशा या पावन भूमीत अखंड हिंदुस्थानात प्रसिद्ध पावलेले महान संत दत्तवातरी श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज इ.स. 1839 ते 1909 या काळात पवनी येथे विठ्ठल मंदिर व मुरलीधर मंदिरात मुक्कामाला होते. उज्जैनला प्रथम संन्यास घेतल्यावर गंगोत्रीपासून रामेश्वर व द्वारकेपासून त्यांनी राजमहेंद्री पायी प्रवास केला. आयुष्यात ते कुठल्याही वाहनात बसले नाहीत. तुर्या अवस्थेत असताना त्यांना नेहमी दत्तप्रभूंकडून संदेश मिळत. दत्तप्रभूंच्या आज्ञेने धर्मप्रसारासाठी 24 चातुर्मास देशाच्या विविध भागात त्यांनी केले. त्यात महाराष्ट्र पवनी येथेही केला चातुर्मास सुरू असताना नरसोबाची वाडी, पुण्याहून लोक येत असत. चातुर्मासात अनंतचतुर्दशीच्या दिवशी पुण्याचे प्रसिद्ध संत योगिराज श्रीगुळवणी महाराज यांना स्वामींचा अनुग्रह झाला.

महाराजांसोबत संपूर्ण चातुर्मास सीताराम महाराज (झीरी) बडनेरा. परभणीजवळ गुंज संस्थानाचे श्री योगानंद सरस्वती यांचेही वास्तव्य काळीकरांच्या वाड्यात होते. पवनी येथील विठ्ठल मंदिरात औदुंबर वृक्षाखाली महाराज समाधी लावत असत असत. बऱ्याच लोकांना महाराजांनी येथे अनुग्रह दिला व त्यांचा उद्धार केला. परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती ज्या पाटावर बसत तो पाटही येथे जतन करून ठेवला आहे. मुरलीधर मंदिराच्या कळसावर असलेले विशाल सोन्याचे चक्र त्यांच्या गत वैभवाची साक्ष देते.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या