
सामना प्रतिनिधी। कुडाळ
अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम) व पावशी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी ग्रामपंचायत सभागृह, पावशी येथे शासकीय योजना माहिती मार्गदर्शन शिबिर पार पडले. यावेळी विविध शासकीय योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात देण्यात आली.
शासकीय योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी ग्रा.पं.ने केला. यावेळी कामगार कल्याण योजना, बायोगॅस अनुदान वितरण, संजय गांधी निराधार योजना, सुकन्या समृद्धी योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, मुख्यमंत्री सहाय्यता योजना, अटल पेंशन योजना, उज्वला गॅस योजना, श्रावणबाळ योजना, स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा, आम आदमी विमा योजना, म.ज्योतीबा फुले जीवनदायी आरोग्य योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, निवृत्तीवेतन योजना याविषयी यश फाऊंडेशनचे मार्गदर्शक रामदास तेंडोलकर यांनी माहितीपर मार्गदर्शन केले.
या शिबिरला सभापती राजन जाधव, उपसभापती .श्रेया परब, जि.प. सदस्य अमरसेन सांवत, सरपंच भिकाजी (बाळा) कोरगांवकर, उपसरपंच दिपक आंगणे, कामगार कल्याण अधिकारी साळगावकर, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























































