मतदानासाठी ठाणेकरांना भरपगारी रजा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लाखमोलाचे मत देता यावे यासाठी ठाणेकरांना भरपगारी रजा मिळणार आहे. जिल्ह्यातील सरकारी तसेच खासगी आस्थापनांना हा आदेश लागू करण्यात आला आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी याबाबत माहिती दिली आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे यासाठी भरपगारी रजा देण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले आहेत. नोकरीनिमित्त अन्य जिल्ह्यांत असलेल्या पण ठाणे जिल्ह्यातील मतदार यादीत नाव असलेल्या सर्व नागरिकांना हा नियम लागू आहे.