
पेटीएम अकाउंट अपेडट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्याने तरुणाला 1 लाख 23 हजारांचा ऑनलाईन गंडा घातला. याप्रकरणी नईम शेख वय 44, रा. वडगाव शेरी यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्याने नईमला फोन करुन पेटीएम कंपनीतून बोलत असल्याची बतावणी केली. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादित करून पेटीएम अपडेट करण्याच्या बहाण्याने बँकखात्याची गोपनीय माहिती विचारुन घेतली. त्यानंतर ऑनलाईनरित्या 1 लाख 23 हजारांचा गंडा घातला. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख तपास करीत आहेत.
























































