क्रेडिट कार्डने मोठी रक्कम भरणे ठरणार महाग, पेटीएम वॉलेटच्या युजर्सना झटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नव्या वर्षात पेटीएम युजर्सना मोठाच झटका बसणार आहे. कारण क्रेडिट कार्डद्वारे 10 हजारांपेक्षा मोठी रक्कम पेटीएमच्या ई-वॉलेटवर भरल्यास 2 टक्के चार्ज लागणार आहे. कंपनीच्या नव्या नियमावलीत ही माहिती देण्यात आली आहे. पेटीएमच्या वॉलेटवर यूपीआय किंवा डेबिट कार्डद्वारे कितीही रक्कम भरली तरी त्यावर काहीच चार्ज घेतला जात नाही आणि यापुढेही घेतला जाणार नाही असेही नियमावलीत नमूद करण्यात आले आहे.

पेटीएमने ट्विटच्या माध्यमातूनही याबाबतची माहिती दिली आहे. त्यात ते म्हणतात, क्रेडिट कार्डद्वारे पेटीएमच्या ई-वॉलेटमध्ये 10 हजारांहून जास्त रक्कम भरायची असेल तर त्या व्यवहारावर एकूण रकमेच्या 1.75 टक्के रक्कम, अधिक जीएसटी देणे सक्तीचे करण्यात आले आहे. गेल्या वर्षीही पेटीएमने याबाबत पावले उचलण्याचा निर्णय घेतला होता, पण काही कारणास्तव तो लागू करण्यात आला नाही. आता नव्या वर्षात 1 जानेवारीपासून त्यांनी या मोठय़ा रकमेवर 2 टक्के चार्ज घ्यायला सुरुवात केली आहे. आता पेटीएम युजर्स यावर काय प्रतिक्रिया देतात ते पाहायचे.