आधी कामावरून काढले, आता नोकरी शोधण्यासाठी मदत, पेटीएम माजी कर्मचाऱ्यांवर मेहेरबान

पेटीएमची पॅरेंट कंपनी ‘वन97कम्युनिकेशन्स’ने आपल्या व्यवसायाची पुनर्रचना करण्याचे ङ्खरवले आहे. याचाच भाग म्हणून पेटीएम कंपनीने मोङ्गी नोकरकपात सुरू केली आहे. मात्र कर्मचाऱयांना कामावरून काढून टाकल्यानंतरही पेटीएम कंपनी त्यांच्या पाङ्गीशी उभी आहे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये असे पहिल्यांदा घडत आहे. माजी कर्मचाऱयांसाठी पेटीएम कंपनी अन्यत्र नोकऱ्या शोधण्यात मदत करत आहे.

पेटीएमने आतापर्यंत एकूण किती कर्मचाऱयांना कामावरून काढून टाकले त्याची अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र कंपनीने एक निवेदन जारी करून माजी कर्मचाऱयांच्या नोकरीसाठी 30 कंपन्यांसोबत संपर्कात असल्याचे सांगितले. नोकरी शोधण्यासाठी ज्या कर्मचाऱयांनी मदत मागितली होती, त्यांना कंपनीने मदत करायचे ठरवले आहे.

पेटीएम कंपनी आपल्या व्यवसायाची पुनर्रचना करत आहे. यापुढे कंपनीत एआय तंत्रज्ञानावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱयांना कामावरून काढून टाकण्यात येत आहे. कर्मचाऱयांच्या थकीत बोनसचे पारदर्शकतेने वाटप करण्यात येईल, असे कंपनीने सांगितले आहे.

पेटीएमने मार्च 2024 मध्ये सुमारे 3500 कर्मचाऱयांना नारळ दिला होता. त्यामुळे उरलेल्या कर्मचाऱयांची संख्या 36 हजार 521 झाली आहे. आरबीआयने कडक कारवाई केल्यानंतर पेटीएम कंपनीचे 550 कोटींचे नुकसान झाले. त्यामुळे कंपनीने मोङ्गय़ा प्रमाणात नोकरकपात सुरू केली.

फिनटेक कंपनी ‘कन 97 कम्युनिकेशन्स’चा आर्थिक कर्ष 2023-24 मध्ये चौथ्या तिमाहीतील आर्थिक तोटा काढून 550 कोटी झाला आहे. कंपनीने जानेकारी – मार्च तिमाहीत पेटीएम पेमेंट बँक लिमिटेड (पीपीबीएल) मध्ये 39 टक्के भागीदारी करून 227 कोटी रुपयांची गुंतकणूक बुडीत खात्यात टाकली आहे. पेटीएमचे संस्थापक किजय शेखर शर्मा पीपीबीएलमध्ये 51 टक्के भागीदारी आहे.