
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ५६ गटांसाठी आणि ९ पंचायत समित्यांच्या १११ जागांसाठी आज शांततेत मतदान झाले. जिल्हा परिषदेच्या ५६ जागांसाठी १५० उमेदवार रिंगणात आहेत. पंचायत समितीच्या १११ जागांसाठी ४१२ उमेदवार रिंगणात आहेत.एक जागा बिनविरोध झाली आहे.
निवडणुक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी आज कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. १६२१ पोलीस अधिकारी आणि अमंलदार, १८५३ होमगार्ड,एसआरपीएफच्या दोन कंपनी आणि आरसीपीचे ७० अमंलदार बंदोबस्तासाठी तैनात ठेवण्यात आले होते. मतदान प्रक्रियेसाठी १० हजार १५८ अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात होते.
रत्नागिरी जिल्ह्यात सकाळी पहिल्या टप्प्यात ११.२४ टक्के मतदान झाले होते.२६.४८ टक्के झाले. सकाळी साडे अकरा नंतर मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्या. दीड वाजेपर्यंत ३९.५२ टक्के मतदान झाले.सायंकाळी साडेतीन वाजेपर्यंत ४७.३८ टक्के मतदान झाले. ११ लाख ७३ हजार ९०२ मतदारापैकी ५ लाख ५६ हजार १५९ मतदान झाले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुमारे ५५ टक्के मतदान झाले.































































