परदेशात शिकायला जाताना द्या इंग्रजीची ‘पिअर्सन’ परीक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुदाम कुंभार, (निवृत्त प्राचार्य तथा समुपदेशक)

विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला  एका देशातून दुसऱया देशात  पुढील शिक्षणासाठी जात असताना पिअर्सन टेस्ट ऑफ इंग्लिश (पीटीई) ही परीक्षा उपयुक्त ठरते.  हार्वर्ड व्यावसायिक शिक्षण देणारी संस्था तसेच इनसीड (फ्रान्स) आणि येलबलोबर (न्यूयॉर्क)  जगभरातील हजारो विद्यापीठांमध्ये पीटीई उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.  तसेच ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांमधील व्हिसा मिळवण्यासाठी ही परीक्षा एक पात्रता असते.

पिअर्सन टेस्ट ऑफ इंग्लिश (पीटीई) ही एक व्यापकपणे स्वीकारलेली इंग्रजी भाषा प्रमाण परीक्षा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येते. पीटीई कॉर्पोरेशन इंग्रजी भाषेतील उमेदवाराच्या प्रावीण्यतेचा निकष निश्चित करते. या परीक्षेची तयारी करताना तिचे स्वरूप समजून घेणे महत्त्वाचे आहे.

पिअर्सन टेस्ट ऑफ इंग्लिश या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या  शालेय स्तरावरील इंग्रजी विषयाचे ज्ञान तसेच आकलनाची चाचपणी केली जाते. या तीन तासांच्या चाचणी सत्रामध्ये परीक्षेचे एकूण तीन भाग असतात. एकत्रित संभाषण आणि लेखन तसेच श्रवण आणि वाचन.

तयारी कशी कराल

प्रश्न ः हा परीक्षेचा एक भाग आहे. येथे तुम्हाला खूप तत्पर असणे आवश्यक आहे. तुम्हाला मजकूर वाचण्यासाठी वेळ दिला जातो. तुम्हाला दिलेला वेळ लिखित मजकुराच्या लांबीवर अवलंबून असतो.

उत्तर तयार करणे ः तुम्हाला विचार करण्यासाठी आणि मनात उत्तर तयार करण्यासाठी वेळ दिला जातो. तुम्हाला विचार करण्यासाठी दिलेला सरासरी वेळ 10 ते 15 सेकंदांच्या दरम्यान असेल.

उत्तर देणे ः विचारलेल्या विशिष्ट प्रश्नाचे उत्तर तुम्हाला द्यावे लागेल. तुम्ही दिलेले उत्तर तुम्ही बोलता तेव्हा रेकॉर्ड केले जाते आणि तुम्ही लिहिताना मजकूर म्हणून जतन केले जाते.

  • परीक्षेचे नाव ः पिअर्सन टेस्ट ऑफ इंग्लिश
  • आयोजन ः पिअर्सन  इन्कॉर्पोरेटेड
  • कधी द्यायची ः संपूर्ण देशभरात काही ठरावीक परीक्षा केंद्रांवर या परीक्षेचे आयोजन वर्षभर होत असते.
  • केंद्र ः हिंदुस्थानातील एकूण 19 परीक्षा केंद्रांवर या परीक्षेचे आयोजन करण्यात येते.
  • निकाल ः परीक्षा झाल्यानंतर पाचव्या दिवशी तुम्ही परीक्षेत प्राप्त केलेले गुण पाहू शकता किंवा ते तुम्हाला ऑनलाइनसुद्धा मिळू शकतात. तसेच प्राप्त गुण तुम्हाला तुमच्या ई-मेलवर मिळतात.
  • निकाल पाठवण्याची पद्धत ः  तुम्ही तुमचे प्राप्त गुण कोणतेही शुल्क न भरता जास्तीत जास्त संस्थांना पाठवू शकता.
  • गुणांची कालमर्यादा ः दोन वर्षे
  • एकूण निर्धारित वेळ ः  3  तास
  • गुणांची श्रेणी ः 00 – 90
  • परीक्षा प्रकार ः पीटीई सामान्य- इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट संपादन,  पीटीई शैक्षणिक – इंग्रजी प्रावीण्य चाचणी म्हणून, नोकरी किंवा पुढील उच्च शिक्षणासाठी.
  • परीक्षा अर्हता निकष ः पीटीई सामान्य – कोणतेही विशेष निकष नाहीत.
  • पीटीई शैक्षणिक ः वयोमर्यादा 16 वर्षे  किंवा त्यापुढील उमेदवार.
  • परीक्षा शुल्क ः अंदाजे  रु. 13,300/-
  • परीक्षा पद्धत ः ऑनलाइन

नेमकी परीक्षा कशी ? 

  • संभाषण आणि लेखन साधारण 77 ते 93  मिनिटांचा कालावधी .
  • यामध्ये स्वपरिचय, वाचन, चित्रवर्णन, लिहिलेल्या साहित्याचा सारांश करणे, प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहिणे, निबंध लेखन इत्यादी.
  • वाचन साधारण 32 ते 40 मिनिटे. यामध्ये वाचन, लेखन, रिकाम्या जागा भरणे, बहुपर्यायी प्रश्नोत्तरे इत्यादी.
  • श्रवण साधारण 45 ते 57 मिनिटे. ऐकलेल्या उताऱयाचा सारांश तयार करणे, रिकाम्या जागा भरणे, बहुपर्यायी प्रश्नोत्तरे, वाक्यातील कमी असलेला शब्द शोधणे इत्यादी.
  • पीटीई परीक्षेसाठी  https://www.pearsonpte.com  या  अधिकृत  वेबसाईटवर तुम्हाला नोंदणी करावी लागेल. तुमच्या सोयीनुसार जवळचे परीक्षा केंद्र निवडून परीक्षेचा दिनांक निवडावा.