
भरधाव मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास साळुंखे विहार रस्त्यावर घडली. रिचर्ड चार्ली मॉरिस (वय 60, रा. कमला सोसायटी, कोंढवा) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी मोटारचालक अनिकेत विश्वास पांगारे (वय 26, रा. वरवे खुर्द, ता. हवेली) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मॉरिस यांचा मुलगा मिक्की याने याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
रिचर्ड मॉरिस मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास साळुंखे विहार रस्त्यावरून चालले होते. त्यावेळी कमला सोसायटीच्या समोर भरधाव मोटारीने पादचारी मॉरिस यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या मॉरिस यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे तपास करत आहेत.



























































