युवा पिढीने आरोग्याची काळजी घेण्याची गरज – प्रतापराव पाटील

28

सामना प्रतिनिधी । जळगाव

शारीरिक व मानसिक स्थिती उत्तम ठेवण्यासाठी युवा पिढीने आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. पिअर एज्युकेटर यांनी आरोग्य दूत म्हणून कार्य करावे, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले.

धरणगाव तालुक्यातील पाळधी खु. या उपकेंद्रात राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य अंतर्गत पिअर एज्युकेटर यांच्या तालुकास्तरीय मेळाव्या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील बोलत होते.

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चांदसर अंतर्गत पाळधी खु. उपकेंद्रात राष्ष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत सर्व पिअर एज्युकेटर यांचा धरणगाव तालुकास्तरीय मेळावा राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधुन आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे युवा जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील हे होते.

सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापुजन करण्यात आले. यावेळी धरणगाव तालुक्यातील सर्व पिअर एज्युकेटर यांना जि.प. सदस्य प्रतापराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते टिफीनचे वितरण करण्यात आले. यावेळी सर्व पिअर एज्युकेटर साठी प्रश्नमंजुषेचाही कार्यक्रम घेण्यात आला. १२ ते १८ वर्ष वयोगटातल्या किशोर अवस्थे मध्ये येणाऱ्या आरोग्य विषयक समस्या गाव पातळीवर सोडवण्याचे काम पियर एज्युकेटर करीत आहेत. यावेळी जिल्हा आर. के .एस. केचे कोआरडीनेटर पौर्णिमा पाटील, पं स. सदस्य मुकुंदा नन्नवरे यांनी सर्व पिअर एज्युकेटर यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला सरपंचा वैशाली माळी, प्रा. आ. केंद्र चांदसरचे वैद्यकिय अधिकारी डॉ. शिवराय पाटील, डॉ. शितल चव्हाण व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन डॉ. शिवराय पाटील यांनी केले. आभार डॉ. शितल चव्हाण यांनी मानले.

आपली प्रतिक्रिया द्या