पेणजवळील अपघातात ग्राहक संरक्षण कक्षाच्या माजी पदाधिकाऱ्याचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून पेणजवळील गोकिर्ले गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष हरिभाऊ पाटील यांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर केशव मानकावळे हे गंभीर जखमी झाले. हे दोघेही पेणचे रहिवासी होते.

मुंबई-गोवा महामार्गावरील गोकिर्ले गावानजीक केशव मानकावळे यांच्या गाडीतून हरिभाऊ पाटील पनवेलहून पेणच्या दिशेने येत असताना गाडी रस्त्याखाली दरीत जाऊन अपघात घडला. रस्त्याजवळून सिडको पाण्याची पाइपलाइन गेली असल्याने व पाइनलाइनवर सिमेंट काँक्रीट केले असल्याने साईडपट्टी व पाइपलाइनमध्ये त्यांची कार अडकली. यामध्ये दोघांना जबर मार लागला व ते अडकून राहिले. दोघांना पेण येथे उपचारार्थ दाखल केले. मात्र डॉक्टरांनी हरिभाऊ पाटील यांना मृत घोषित केले.