
सामना प्रतिनिधी। पेण
पेण तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील गडब या गावात एकाच रात्रीत भामट्यांनी पाच घरे फोडली. तसेच औषधाच्या दुकानातही चोरी करण्याचा प्रयत्न केला.
गडब येथे 24 जुलै रात्री 1: 30 सुमारास अज्ञात चोरट्यानी येथील बंद असलेल्या पाच घराचे व एका औषधाच्या दुकानाचे दरवाजाचे कोयडे तोडुन व कपाट तोडुन घरातील सामान अस्ताव्यस्त केले. मात्र या घरात राहाणारे नागरिक नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर राहात आसल्याने चोरट्याचे हाती काहीच लागले नाही. यामुळे बाजूलाच असलेल्या औषधाच्या दुकानाकडे चोरट्यानी मोर्चा वळवला. यावेळी दुकान फोडून त्यातील रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. मात्र हे चोरटे सी.सी. टीव्ही मध्ये कैद झाल्याने पोलीस चोरट्याचा तपास घेत आहेत. घटनेची नोंद वडखळ पोलिस ठाण्यात करण्यात आली असून वडखळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक बी. के जाधव तपास करीत आहेत.
































































