
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
आपल्या सूर्यमालेत आठ ग्रहां व्यतिरिक्त अनेक चंद्र , लघु ग्रह व धुमकेतू यांचा समावेश असतो. तसे वर्षभरात साधारण ड़झनभर धुमकेतू आकाशात येऊन जातात. परंतु अलीकडे लक्षात राहील असा एकही धुमकेतू आकाशात पहायला मिळाला नाही. असाच एक धुमकेतू सध्या रात्रीच्या आकाशात दिसतो आहे. खगोल अभ्यासकांना व खगोल प्रेमींना ही एक संधीच असणार आहे.
४६P/ वेरेतनन हा पिरीऑड़िक धुमकेतू वर्ष २०१८ च्या ड़िसेंबर महिन्यात शहराबाहेर रात्रीच्या काळोखात आकाशात द्विनेत्री, दुरदर्शक किंवा साध्या ड़ोळ्यांनी पाहण्याची संधी मिळणार आहे. १६ ड़िसेंबर २०१८ रोजी हा ४६P/ वेरेतनन हा पिरीऑड़िक धुमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ म्हणजे १ कोटी १५ लाख ८६,३५० किमी अंतरावर असणार आहे.
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला एरीडूनस ( भरणी नक्षत्राच्या दक्षिणेस ) हा धुमकेतू दिसणार असून दिनांक दहा – तेरा दरम्यान भरणीच्या पूर्वेस पाहता येईल. जेंव्हा हा धुमकेतू पृथ्वी जवळ असणार आहे ( दिनांक १६ डिसेंबर ) त्या दिवशी कृतीक्का नक्षत्राच्या अतिशय जवळ दिसणार आहे. तसाच तो पुढे सरकत सारथी तारका समूहातील ब्रम्हहृदय या तार्या जवळ असणार आहे. म्हणजे या धूमकेतूचा डिसेंबर महिन्यातील प्रवास हा दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्ध असा असणार आहे. त्यामुळे भारता सारख्या देशातील नागरिकांसाठी या धूमकेतूला निराक्षणाची चांगली संधी असणार आहे.
४६P/ वेरेतनन हा पिरीऑड़िक धुमकेतू मात्र वर्ष २०१८ च्या ड़िसेंबर महिन्यात शहराबाहेर रात्रीच्या काळोखात आकाशात द्विनेत्री, दुरदर्शक किंवा साध्या ड़ोळ्यांनी पाहण्याची संधी मिळणार आहे.
दिनांक १६ ड़िसेंबर २०१८ रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६:३६ वाजता या ४६P/ वेरेतनन हा पिरीऑड़िक धुमकेतू चे पृथ्वी पासूनचे अंतर केवळ १ कोटी १५ लाख ८६,३५० किमी इतकं कमी असणार आहे. यामुळे या धुमकेतू ने मानवाच्या ज्ञात असलेल्या काळातील सर्वात जवळ असलेल्या वीस धुमकेतू च्या यादीमध्ये आपले स्थान पक्के केले आहे.
संभाजीनगरमधून पहायची संधी
औरंगाबाद येथील एमजीएम च्या एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्रा तर्फे दिनांक १३ ड़िसेंबर रात्री खास आकाश दर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान ४६P/ वेरेतनन हा धुमकेतू पहायला मिळणार आहे. अधिक माहितीसाठी ०२४०- २४८०५७७ ९८५००८०५७७ या क्रमांकावर खगोलअंतराळ विज्ञान केंद्रावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

































































