टायगर श्रॉफची धावाधाव लोकांना आवडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता टायगर श्रॉफने सोशल मीडियावर त्याच्या आगामी चित्रपटातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये धावण्याच्या स्पर्धेचे चित्रीकरण सुरू असताना टीपलेली दृश्ये आहेत. या व्हिडीओला कू अॅपवर 2.5 हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत. या व्हिडीओ कोणत्या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान टीपण्यात आला आहे, हे मात्र कळू शकलेलं नाहीये. टायगर याचा पुढील चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. विकास बहल यांचे दिग्दर्शन असलेला ‘गणपत: पार्ट 1’ सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. पुढच्या वर्षी टायगरचे 2 चित्रपट प्रदर्शित होणार असून शशांक खेतान यांनी दिग्दर्शित केलेला ‘स्क्रू ढीला है’ हा टायगरची भूमिका असलेला चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. अली अब्बास जफर यांनी दिग्दर्शित केलेला ‘बड़े मियां छोटे मियां’ मध्येही टायगरची भूमिका असून हा चित्रपट पुढच्या वर्षी डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे.