
पीएचडी आणि एमफील प्रवेशाची पेट परीक्षा वर्षातून दोनदा घेण्यात येणार असल्याचे प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांनी मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशानात जाहीर केले. यंदापासूनच याची अंमलबजावणी होणार असून या निर्णयामुळे पेट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
मुंबई आणि परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढत असल्याने मुंबई विद्यापीठाची सिनेट बैठक ही ऑनलाईन पद्धतीने आज सुरू झाली. कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर वैद्यकीय रजेकर असल्याने प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन पार पडले. गेल्या वर्षी 27 फेब्रुवारी ते 18 मार्चदरम्यान पेट परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. कोरोनामुळे अर्ज भरण्यास चार वेळा मुदतवाढ देण्यात आली होती.
पेट परीक्षेसाठी विद्यापीठाकडे 11 हजार 759 एवढे तर पीएचडीसाठी 11 हजार 352 तर एमफीलसाठी 407 एवढे अर्ज आले. मात्र 2020 मधील पेट परीक्षा 2021 मध्ये घेण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा मुद्दा युवासेना सिनेट सदस्य ऍड. वैभक थोरात आणि धनराज कोहचाडे यांनी सिनेटमध्ये उपस्थित केला.
मुंबई विद्यापीठामध्ये संशोधनाला वाव मिळावे यासाठी ही परीक्षा वर्षातून तीन वेळा व्हावी अशी मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. असे असतानाही विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी देण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा मुद्दा उपस्थित करत थोरात व कोहचाडे यांनी प्र-कुलगुरूंना धारेकर धरले.
आजच्या पहिल्या दिवशी सिनेटची सुरूवात ही अभिनंदन प्रस्तावाने झाली. तर त्यानंतर तांत्रिक चुकांवर चर्चा झाली. यात येस बँकेतील ठेवीसंदर्भात मुद्दा जोरदार गाजला. या विषयाकर सिनेट सदस्या कारंडेसोबतच डॉ. धनराज कोहचाडे, प्रा. वैभक नरवडे, प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, सुधाकर तांबोळी आदींनी याविषयी प्रशासनाला धारेकर धरले. यामुळे प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांनी याप्रकरणी समिती नेमण्यात आली असून चौकशी सुरू असल्याचे उत्तर दिले.
त्या 140 कोटी रूपयांच्या ठेवीवरून गदारोळ
मागील काळात विद्यापीठाने येस बँकेत ठेकलेल्या ठेवीवरून आज मुंबई विद्यापीठाच्या सिनेटमध्ये बराच गदारोळ झाला. सिनेट सदस्या सुप्रिया कारंडे यांनी हा विषय उपस्थित केला, त्यावर इतर सिनेट सदस्यांनीही विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरत याविषयी जाब विचारला.
























































