
पाळीव प्राण्यांच्या सुरक्षिततेबाबत त्यांच्या मालकांना- पालकांना चिंता असते. प्राण्यांना कोणतीही हानी पोहोचू नये, असे वाटत असते. यासाठीच एक खास पेट सेफ्टी ऍप विकसित करण्यात आले आहे. ‘कॅप्टन इंडिया’ असे या ऍपचे नाव आहे.
झायमॅक्स टेक्नॉलॉजीज या कंपनीने ‘नो मोअर पेट लॉस’ नावाची मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत कंपनीने ऍप तयार केले आहे. या मोहिमेचे उद्दिष्ट पाळीव प्राण्यांच्या सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करणे हे आहे, जेणेकरून पाळीव प्राण्यांना क्यूआर आयडेंटिफिकेशन, एनएफसी कोड टॅग, जीपीएस ट्रॅकर्स, व्हर्च्युअल सेफ झोन आणि कायमस्वरूपी सेफ्टी कमांड स्टेशन सर्व्हिसेस दिली जाईल, जेणेकरून पाळीव प्राणी भटकणार नाहीत किंवा हरवणार नाहीत.
मोहिमेविषयी अधिक माहिती देताना झायमॅक्स टेक सोल्युशन्सचे प्रमोद राव म्हणाले, दरवर्षी शेकडो पाळीव प्राणी बेपत्ता होतात. पाळीव प्राणी गमावणे हे कुटुंबातील सदस्य गमावण्यासारखे आहे आणि हे भावनिक नुकसान कधीही भरून न येणारे आहे. ‘कॅप्टन इंडिया’ लाँच करून हे नुकसान कमी करण्याचे आणि पाळीव प्राण्यांच्या पालकांना त्यांच्या प्रेमळ मित्रांच्या सुरक्षेची हमी देण्याचे आमचे ध्येय आहे.
























































