
पेट्रोल-डिझेल दरवाढीचा रोज नवा विक्रम सुरू असतानाच एलपीजी गॅस सिलिंडर 43 रुपयांनी महागला असून, नैसर्गिक वायूच्या दरात तब्बल 62 टक्क्यांनी वाढ केल्याने सीएनजी दरवाढ अटळ आहे. दसरा-दिवाळी या सणासुदीच्या तोंडावर इंधन दरवाढीचा आणखी भडका उडाल्याने लोकांचे खाणे, फिरणे महागले आहे.
शुक्रवारी पेट्रोल 25 पैसे आणि डिझेल 30 पैसे प्रतिलिटर महागले आणि ‘ऑल टाइम हाय’ दराचा आणखी एक विक्रम केला. राजधानी दिल्लीत पेट्रोल पहिल्यांदा 101.89 रुपये तर डिझेल 90.17 रुपये प्रतिलिटरवर गेले. मुंबई, पुण्यासह देशातील बहुतांशी शहरांमध्ये पेट्रोल 105 ते 108 रुपये प्रतिलिटरवर गेले असून, डिझेलची शंभरीकडे वाटचाल सुरू आहे.
नऊ महिन्यांत 404 रुपयांनी गॅस दरवाढ
z व्यावसायिक वापराच्यर्ंा 19 किलो गॅस सिलिंडरच्या दरात 43 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे 19 किलोचे सिलिंडर 1735 रुपयांवर गेले आहे. नऊ महिन्यांत तब्बल 404 रुपयांनी सिलिंडर महाग झाले आहे. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात वाढ गेल्याच महिन्यात 25 रुपयांनी झाली होती. यावेळी दरवाढ केली नसली तरी 14 किलोचे सिलिंडर 887 रुपयांवर गेले आहे. त्यातच पेंद्र सरकारने गेल्या दीड वर्षांपासून सबसिडी अचानक बंद केली आहे.
वाहतूक महागल्यामुळे सर्व वस्तू महागणार
z पेट्रोल, डिझेल, सीएनजी, गॅस दरवाढीमुळे लोकांचे खाणे-फिरणे महाग होणार. त्याचबरोबर मालवाहतूक महागल्यामुळे सणासुदीच्या दिवसांत सर्वच वस्तूंची दरवाढ होणार आहे.
शहर पेट्रोल डिझेल
मुंबई 107.95 97.84
पुणे 107.64 96.05
मध्यमवर्गीयांना झटका
अनेक शहरांमधील कार, ऑटोरिक्षा सीएनजीवर आहेत. मात्र, शुक्रवारपासून नैसर्गिक वायूच्या पिंमती तब्बल 62 टक्क्यांनी वाढविल्या आहे. आता प्रति दशलक्ष ब्रिटिश थर्मल युनिटसाठी (बीटीयू) 2.90 डॉलर इतका दर असणार आहे. हा नैसर्गिक वायू प्रामुख्याने सीएनजी आणि मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या मोठय़ा शहरांमध्ये पाईपद्वारे पुरवण्यात येणाऱया घरगुती गॅसच्या निर्मितीसाठी वापरला जातो. त्यामुळे नैसर्गिक वायू महागल्यामुळे सीएनजी आणि पाईपद्वारे पुरवल्या येणाऱया गॅसची दरवाढ अटळ आहे. सध्या 58 रुपयांवर प्रतिकिलो सीएनजीचा दर असून, यामध्ये किमान 10 ते 15 टक्के दरवाढ अटळ आहे.




























































