सोळाव्या दिवशी पेट्रोल १६ पैशांनी महाग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

इंधनवाढीचा रेटा आज सोळाव्या दिवशीही सुरूच असून पेट्रोलच्या दरात १६ तर डिझेलच्या दरात १४ पैशांनी वाढ झाली. १४ मे पासून सुरू असलेल्या इंधनदरवाढीला सरकारला अद्याप आळा घातला आलेला नाही. त्यामुळे गेल्या सोळा दिवसांत पेट्रोलचे दर ३ रुपये ९९ पैशांनी तर डिझेलचे दर ३ रुपये ६२ पैशांनी वाढले आहेत. सोमवारपासून दिल्लीतील सीएनजीचे दरही १ रुपये ३६ पैशांनी तर नोएडा व गाजियाबादमध्येही सीएनजीच्या दर १ रुपये ५५ पैशांनी वाढले आहेत.

इंडिगोचे तिकीट आजपासून ४०० रुपयांनी महागणार
एयरक्राफ्ट फ्यूल म्हणजेच इंधनाच्या किमती वाढल्याने इंडिगोने आपल्या तिकीटदरात फ्यूल सरचार्जच्या स्वरूपात ४०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हे दर आजपासून लागू होणार आहेत. १ हजार किलोमीटरपर्यंतच्या प्रवासावर २०० आणि त्याहून अधिक किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी प्रवाशांना अतिरिक्त ४०० रुपये मोजावे लागणार आहेत. सध्या हिंदुस्थानी एयरलाइन्स कंपन्यांमध्ये केवळ इंडिगोनेच फ्यूल सरचार्ज वाढवले आहेत. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या तर तिकीट दरवाढही पुन्हा कमी करण्यात येईल, असेही कंपनीने म्हटले आहे. दरम्यान, विमान कंपन्यांच्या एकूण देखभाल खर्चापैकी ४० टक्के खर्च केवळ इंधनावरच होतो, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

पेट्रोल
शहर        मंगळवार              सोळा दिवसांतील वाढ
दिल्ली       ७८रु. ४३ पैसे        ३ रु. ८० पैसे
कोलकाता   ८१रु. ६ पैसे          ३ रु. ७४ पैसे
चेन्नई        ८१रु. ४३ पैसे          ३ रु. ९९ पैसे

डिझेल
शहर        मंगळवार              सोळा दिवसांतील वाढ
दिल्ली        ६९रु. ३१ पैसे            ३ रु. ३८ पैसे
कोलकाता   ७१ रु. ८६ पैसे           ३ रु. २३ पैसे
चेन्नई         ७३रु. १८ पैसे            ३ रु. ६२ पैसे