
गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने पेट्रोलच्या किमती वाढताना दिसत आहेत. देशातल्या दिल्ली, मुंबई आणि कोलकातासारख्या शहरांमध्ये या वाढीचा परिणाम होणार आहे. दुसरीकडे डीझेलचे भाव घसरत असल्याने सामान्यांना त्यातल्या त्यात दिलासा मिळाला आहे.
दिल्ली, मुंबई आणि कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत 10 पैसे तर चेन्नईमध्ये 11 पैसे प्रतिलीटरने वाढली आहे. इंडियन ऑइलच्या वेबसाईटने मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली, कलकत्ता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोलच्या किमतीत अनुक्रमे 74.54 रुपये, 77.22 रुपये, 80.20 रुपये, आणि 77.49 रुपये प्रतिलीटर इतकी वाढ झाली आहे. त्याउलट या चारही शहरांतील डिझेलची किंमत अनुक्रमे 65.73 रुपये, 68.14 रुपये, 68.94 रुपये, आणि 69.47 रुपये प्रतिलिटर इतकी घटली आहे.
गेल्या आठवड्यातही इंधनदर अशाच प्रकारे वाढले होते. गेल्या आठवड्यात दिल्लीत पेट्रोलची प्रतिलिटर किंमत 73.77 रुपये, कोलकातामध्ये 76.47 रुपये तर मुंबईत 79.44 रुपये इतकी होती. चेन्नईत प्रतिलिटर पेट्रोल 76.68 पैसे इतके मिळत होती. त्या तुलनेने गेल्या आठवड्यापर्यंत स्थिर असलेल्या डीझेलच्या किमती घटल्या आहेत

































































