
सायकल शर्यत म्हटलं की आपल्याला जो जिता वही सिकंदर मधली आमीर खानची शर्यत आठवते. मात्र अमेरिकेतील लोकांसाठी तर लक्षात राहिल अशी सायकल शर्यत म्हणजे फिलाडेल्फीया शहरात आयोजित केली जाणारी नेकेड बाईक राईड. शरीरावर एकही कपडा नसला पाहिजे अशी अट या स्पर्धेच्या आयोजकांची असते मात्र आता या वर्षी या अटीत बदल केला आहे. अंगावर कपडे न घालण्याची अट असली तरी स्पर्धकांना तोंडावर मास्क मात्र घालावा लागणार आहे.
या स्पर्धेत दरवर्षी हजारो स्पर्धक सहभागी होतात. अंगावर एकही कपडा न घालता हे स्पर्धक 16 किलोमीटर सायकल चालवत ही स्पर्धा पूर्ण करतात. या स्पर्धेत फक्त पुरुषच नाही तर अनेक महिला देखील भाग घेत असतात.
ही स्पर्धा यंदा 28 ऑगस्टला आयोजित करण्यात आली आहे. मात्र तोपर्यंत जर अमेरिकेत कोरोनाचा प्रभाव कमी झाला तर स्पर्धकांना मास्क देखील लावायची गरज भासणार नाही, असे या स्पर्धेचे आयोजक वेसली नूनान यांनी सांगितले.





























































