Photo – आदित्य ठाकरे यांची मुरूड येथे प्रचारसभा, सभेला तुफान प्रतिसाद

रायगड लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार अनंत गिते यांच्या प्रचारार्थ आज युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुरुड येथे सभा घेतली. यावेळी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश चिटणीस प्रवीण ठाकूर, काँग्रेसचे आमदार भाई जगताप, शिवसेना आमदार संजय पोतनीस, शेकाप रायगड जिल्हा चिटणीस (महिला) चित्रलेखा पाटील, शेकाप माजी आमदार पंडित पाटील, मराठा मुस्लिम संघ अध्यक्ष फकीर मोहम्मद ठाकूर, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख विष्णू पाटील, सहसंपर्क प्रमुख किशोर जैन, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, युवासेना कार्यकारणी सदस्य पवन जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अलीम खानजादे यांच्यासह इतर नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.