1 / 6
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याचा बुधवारी सर्बियन मॉडेल नताशा स्टेनकोविच (Natasa Stankovic) हिच्यासोबत साखरपुडा झाला.
नताशाच्या आधी हार्दिकचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जुळले. अभिनेत्री एली अवराम हिच्यासोबतच्या अफेअरच्या चर्चाही चांगल्याच रंगल्या.
हार्दिक पांड्या आणि उर्वशी रौताला यांच्या डेटच्या बातम्याही चांगल्या गाजल्या. अनेकदा त्याला उर्वशीसोबत कॅमेऱ्यात कैद करण्यात आले.
इशा गुप्तासोबतही त्याचे नाव जोडले गेले. दोघे लवकरच लग्न करणार असल्याच्याही बातम्या पसरल्या होत्या. इशाने यादरम्यान स्पष्टीकरण दिल्याने सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला होता.



























































