Photo – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळुणात दाखल, नुकसानाची केली पाहणी

ut-chiplun-1

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूण येथे दाखल होताच त्यांनी चिपळूण बाजारपेठ येथे जाऊन व्यावसायिक, दुकानदार यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली, त्यांच्याशी बोलले.

ut-chiplun-2

मुख्यमंत्र्यांनी स्वतः बाजारपेठेत फिरून पुराच्या पाण्यामुळे झालेले नुकसान पाहिले. बाजारपेठ परिसरात पुराच्या पाण्यामुळे मोठे नुकसान झाले होते.

ut-chiplun-3

चिपळूण येथील हॉटेल अभिषेकमध्ये मुख्यमंत्री आढावा बैठकही घेणार आहेत. पालकमंत्री अनिल परब, सिंधुदुर्ग पालकमंत्री उदय सामंत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित आहेत.

ut-chiplun-4

संततधार पावसाने आलेल्या पुरामुळे चिपळुणात पूरस्थिती निर्माण झाली होती. कित्येक लोकांना स्थलांतरित करण्यात आलं. रहिवाशांची घरं, दुकानं यांमध्ये पाणी गेल्याने प्रचंड नुकसान झालं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या