ट्रेंड – लाल साडीतील देखणे सौंदर्य

सोशल मीडियावर एक नवा ट्रेंड सुरू आहे. एआयच्या माध्यमातून तयार केलेल्या लाल साडीतील फोटोची तरुणींना भुरळ पडली असून सर्वजण लाल साडीतील फोटो शेअर करत आहेत. गुगल जेमिनी या एआय आधारित अ‍ॅपवरून काही सेकंदांतच आकर्षक फोटो तयार करून मिळत असून त्यात हवा तसा त्यात बदल करता येतो. पूर्वी पारंपरिक पोशाखात फोटोशूट करण्यासाठी स्टुडिओ, मेकअप आर्टिस्ट किंवा फोटोग्राफरची मदत घ्यावी लागत असे. मात्र आता एआय तंत्रज्ञानामुळे त्यावर खर्च करण्याची तसेच वेळ द्यायची गरज भासत नाही. केवळ एक साधा फोटो अपलोड केला की, काही सेकंदांतच आकर्षक फोटो तयार करून मिळत असल्याने अनेक जण या पद्धती वापरत आहेत. आतापर्यंत फेसबुक, इन्स्टाग्रामवर हजारो तरुणींनी हा ट्रेंड फॉलो केला असून आता अन्य विविध पेहरावांतील फोटोही टाकले जात आहेत.