Photo – मुंबई महानगरपालिका निवडणूक क्षणचित्रे

 पोलिसांचा मोठा फौजफाटा 

मुंबईतील मतमोजणी वेळी मतदान केंद्राबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मतमोजणी केंद्रात जाणाऱ्या सर्वांची कसून चौकशी केली जात होती. मोबाईल घेऊन जाण्यास सर्वांना बंदी घालण्यात आली होती. मुंबईतील पुर्ला, नेहरू नगर येथील मतदान केंद्राबाहेर असलेला पोलिसांचा फौजफाटा दिसत आहे

कार्यकर्त्यांची तोबा गर्दी

मुंबईतील पुर्ला, नेहरू नगर येथील मतदान केंद्राबाहेर सर्वपक्षीय उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी निकाल ऐकण्यासाठी मोठी गर्दी केली होती. प्रत्येक फेरीचा निकाल लाऊडस्पीकरवरून जाहीर केला जात होता. गर्दी नियंत्रणाबाहेर जाऊ नये, यासाठी मुंबई पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात ठेवला होता. ज्या फेरीत उमेदवाराला आघाडी मिळाली त्यानंतर त्या उमेदवाराच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात होता, असे चित्र दिसत होते

मोबाईल घेऊन जाण्यास बंदी

प्रत्येक प्रभागातील उमेदवाराच्या प्रतिनिधीला मतमोजणी केंद्रात जाण्यासाठी गेटवर तपासणी केली जात होती. या प्रतिनिधीला मोबाईल आतमध्ये घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली होती. मतमोजणी सुरू होण्याआधी टप्प्याटप्प्याने उमेदवाराच्या प्रतिनिधीला प्रवेश दिला जात होता. कोणताही गोंधळ उडू नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात होती

डिजिटल बॅनर दिमतीला

कार्यकर्त्यांना प्रत्येक फेरीची माहिती पाहता यावी यासाठी मतदान केंद्राबाहेर डिजिटल बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवर कोणत्या उमेदवाराला किती मते मिळालीमतमोजणीची कितवी फेरी झालीयाची सविस्तर माहिती देण्यात येत होती. डिजिटल बॅनर आणि लाऊडस्पीकरवरून ही मते सांगितली जात होती. प्रत्येक फेरीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत होता.