
एका तरुणाने व्हॉट्सअॅपवर स्टेटसवर कोरोना रुग्ण तरुणीचा फोटो ठेवून आक्षेपार्ह संदेश ठेवला होता. या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.
बेंगळूरूच्या अनिल राठोड या तरुणाने एका 24 वर्षीय तरुणी कोरोना रुग्णाचा फोटो आपल्या व्हॉट्सअॅपवर स्टेटसवर ठेवला. तसेच एक वाईट बातमी एका विद्यार्थिनीला कोरोनाची लागण झाली अशी कॅप्शन ठेवली होती. यामुळे लोकांमध्ये भिती पसरली आणि तसेच एका कोरोना रुग्णाचा फोटो व्हायरल करून तिला बदनाम केल्याप्रकरणी पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे.

























































