Photo – 2021 मध्ये ‘हे’ सेलेब्रिटी अडकले लग्नबंधनात

आज 2021 वर्षाचा अखेरचा दिवस असून उद्यापासून नवीन इंग्रजी नववर्ष सुरू होणार आहे. गतवर्षात बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी लग्नाचा बार उडवून दिला. कतरिना कैफ-विकी कौशलपासून ते दिया मिर्झा, यामी गौतम यासारखे सेलेब्रिटी लग्नबंधनात अडकले.

कतरिना कैफ आणि विकी कौशल – अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ हे 9 डिसेंबरला लग्नबंधनात अडकले. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील किल्ल्यात या दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

वरुण धवन आणि नताशा दलाल – अभिनेता वरुण धवन आणि फॅशन डिझायनर असलेल्या नताशा दलाल यांनी 24 जानेवारीला लग्न केले. दोघांच्या लग्नात कुटुंबिय आणि जवळचेच काही नातेवाईक सहभागी झाले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

राजकुमार राव आणि पत्रलेखा – अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा यांनी 15 नोव्हेंबरला विवाह केला. पारंपरिक पद्धतीने झालेल्या या विवाहसोहळ्याला जवळचेच लोक उपस्थित होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by RajKummar Rao (@rajkummar_rao)

अंकिता लोखंडे आणि विकी जैन – अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने प्रियकर विकी जैन याच्यासोबत 14 डिसेंबरला लग्न केले. हा विवाहसोहळा मुंबईतील एका हॉटेलमध्ये तब्बल तीन दिवस सुरू होता.

यामी गौतम आणि आदित्य थर – अभिनेत्री यामी गौतम हिने आदित्य थर याच्यासोबत विवाह केला. या लग्नात यामीने आईची 33 वर्षांपूर्वीची सिल्क साडी घातली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yami Gautam Dhar (@yamigautam)

दिया मिर्झा आणि वैभव रेखी – अभिनेत्री दिया मिर्था हिने वैभव रेखीसोबत सप्तपदी घेतली. लग्नासाठी दियाने बनारसी साडीची निवड केली होती. यावर तिने लाल दुपट्टा आणि पारिपंरिक सोन्याचे दागिने घातले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dia Mirza Rekhi (@diamirzaofficial)