Photo – तुकाराम बीजनिमित्त आळंदी सजली

देहू येथील संत तुकाराम महाराज बीज सोहळ्या निमित्त देहूत तसेच आळंदीत देखील भाविकांची संत तुकाराम महाराज मंदिरात श्रींचे दर्शनास हरिनाम गजरात भाविकांनी गर्दी केली आहे. देहूत बुधवारी लाखो भाविकांचे उपस्थित संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन सोहळा साजरा होत आहे. देहूत इंद्रायणी नदी घाट परिसरासह श्रीक्षेत्र देहूत विविध ठिकाणी बीज सोहळया निमित्त हरिनाम गजरात धार्मिक कार्यक्रम परंपरेने होत आहे. कीर्तन, प्रवचन, गाथा भजन, गाथा पारायण आदी धार्मिक कार्यक्रमांसह अन्नदान मोठ्या प्रमाणात होत आहे. मंदिरात भाविकांनी रांगा लावून श्रीचे दर्शन घेतले. ज्ञानोबा – माऊली तुकाराम नामजयघोष करीत भाविकांनी दर्शन घेत जयघोष केला.