Photo – मुंबईत वांद्रे स्थानकालगतच्या अनधिकृत बांधकामांवर पश्चिम रेल्वेचा हातोडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून, वांद्रे पूर्व येथील गरीब नगर परिसरात अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतली. या मोहीमे अंतर्गत वांद्रे येथील सुमारे ४०० अनधिकृत बांधकामे हटविण्यात येणार आहेत. कारवाई दरम्यान पोलीस, रेल्वे पोलीस, आरपीएफ व इतर सुरक्षा जवान तैनात होते. तसेच अग्निशमन दल, रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. पोकलेन, बुलडोजरच्या मदतीने अनधिकृत घरे पाडण्यात आली.

फोटो- रुपेश जाधव