
सगळ्यांनाच माकड आणि टोपीवाल्याची गोष्ट माहीत असेल. मात्र अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील बुलंद शहरमधील कोर्टाच्या परिसरात घडली आहे. एका माकडाने वकिलाच्या हातातील बॅग हिसकावली आणि तो झाडावर चढला. त्या
बॅगमध्ये वकिलाने प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प पेपर खरेदी करण्यासाठी दोन लाख ठेवले होते. नागरिकांनी माकडाला विविध आमिषे दाखवून त्याच्या तावडीतून बॅग सोडवण्यासाठी प्रयत्न केले असता माकडाने बॅग उघडली आणि त्यात ठेवलेले दोन लाख रुपये हवेत उधळून लावले. अखेर वकिलाने ओळखीतील लोकांच्या मदतीने जमिनीवर पडलेले पैसे वेचले. मात्र दोन लाखांपैकी पाच हजार रुपये त्याला मिळालेच नाहीत. हा व्हिडीओ @gharkekalesh या ‘एक्स’ पोस्टवरून शेअर करण्यात आला आहे.



























































