
अजूनही जन-धन खात्याचे ई-केवायसी केले नसेल तर सावधान तुमचे खाते फ्रीज होऊ शकते. त्यामुळे घरबसल्या अवघ्या पाच मिनिटांत मोबाईलद्वारे जनधन खात्याची KYC पूर्ण करा.
बँकेत न जाता ऑनलाईन केवायसी करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. बँक खाते बंद होण्यापूर्वी आवश्यक प्रक्रिया स्टेप-बाय-स्टेप पद्धतीने पूर्ण करा.
बँकेचे अधिकृत मोबाईल बँकिंग ऍपच्या मेनूमध्ये ‘Service Request’ किंवा ‘My Profile’ पर्याय निवडा. त्यात ‘Re-KYC’ वर क्लिक करा. आधार क्रमांक टाकून OTP सबमिट करा.
बँकेच्या अधिकृत इंटरनेट बँकिंग पोर्टलवर लॉगिन करा. ‘Profile’ किंवा ‘Update KYC’ सेक्शनमध्ये जाऊन आधार आणि पॅन कार्डची माहिती आधार OTP द्वारे कन्फर्म करा.
अनेक बँकांनी डिजिटल व्हिडीओ केवायसी सुरू केली आहे. वेबसाईटवरील व्हिडीओ KYC लिंकवर क्लिक करा आणि बँक अधिकाऱयांसोबत संपर्क करून प्रक्रिया पूर्ण करा.

























































