
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. निवडणुकांमध्ये गैरप्रकार करण्यासाठी भाजप निवडणूक आयोगासोबत मिळून काम करत असल्याचा दावा करत, त्यांनी या प्रकाराला व्होट चोरी, असे म्हटले आहे. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
अखिलेश यादव यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका करताना आरोप केला की, सत्ताधारी पक्षाला शिक्षणाचे कोणतेही गांभीर्य नाही आणि ते केवळ भ्रष्टाचारावर अवलंबून आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारी अधिकाऱ्यांचा गैरवापर करून जनतेला धमकावले जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. विशेषतः शिक्षण विभागातील अधिकारी निवडणुकीच्या काळात लोकांवर दबाव आणत असल्याचा आरोप यादव यांनी केला आहे.
यादव यांनी पुढे म्हटले की, मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार करण्यात आले आहेत. एकाच मतदाराचे नाव अनेक ठिकाणी नोंदवलेले असल्याच्या तक्रारी वारंवार करूनही, निवडणूक आयोगाने त्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. २०२२ च्या निवडणुकांमध्येही समाजवादी पक्षाच्या अनेक समर्थकांची नावे मतदार यादीतून गायब झाली होती, आणि त्याबाबतही कोणतीही दखल घेतली गेली नाही


























































