Video : फोटोग्राफर्सनी दीपिकाला म्हटले ‘भाभीजी’, रणवीरला हसू अनावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडमध्ये सध्या दीपिका रणवीरच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. बुधवारी संध्याकाळी मुंबईतील पंचतारांकीत हॉटेलमध्ये या दोघांचे रिसेप्शन पार पडले. या रिसेप्शनच्यावेळी दीपिका आणि रणवीर मीडियाच्या फोटोग्राफर्ससमोर आले तेव्हा फोटोग्राफरनी दीपिकाला ‘भाभीजी’ म्हणून हाक मारायला सुरुवात केली. ते ऐकून काही वेळ दीपिका गोंधळली. रणवीरला मात्र त्यावर हसू आवरलं नाही व तो जोरजोरात हसू लागला. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


View this post on Instagram

#ranveersingh laughs his heart out as he hears the word ‘bhabhiji’

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

दीपिका व रणवीर हे 14 नोव्हेंबर रोजी इटली येथे विवाहबंधनात अडकले. 14 नोव्हेंबरला कोंकणी पद्धतीने तर 15 नोव्हेंबरला सिंधी पद्धतीने त्यांचे लग्न पार पडले. त्यानंतर 21 नोव्हेंबरला त्यांचे बंगळुरूत व 28 नोव्हेंबरला मुंबईत दोन ग्रॅण्ड रिसेप्शन पार पडले.