1 / 5
आपण सगळेच लहानपणी सर्कसला गेलेलो आहोत. पण तुम्हाला माहितीये का, हिंदुस्थानातल्या पहिल्या सर्कसची सुरुवात कोणी केली? गंमत म्हणजे हा मान एका मराठी माणसाचा असून विष्णुपंत छत्रे असं त्यांचं नाव आहे. 20 फेब्रुवारी हा त्यांचा स्मृतिदिन. यानिमित्त जाणून घेऊ हिंदुस्थानी सर्कशीची जन्मकथा
विष्णुपंत उर्फ विष्णु मोरेश्वर छत्रे यांचा जन्म 1846 रोजी झाला. त्यांनी उत्कृष्ट गायक म्हणून नावलौकिक मिळवला आणि विष्णुचा विष्णुपंत झाले.
मुंबईला आल्यानंतर एकदा विष्णुपंत उत्सुकतेपोटी त्याकाळची प्रसिद्ध अशी विल्सन साहेबाची सर्कस पाहायला गेले. मात्र, विल्सनने त्यांचा अपमान केला आणि सर्कस काढणं हे काळ्या हिंदुस्थानींना कधीही शक्य नाही, अशा शब्दांत त्याने विष्णुपंतांना हिणवलं.



























































