Photo – या अभिनेत्रीचे इंस्टावर नाव आहे ‘बटाटावडा’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंस्टाग्रामवरचा प्रत्येक युजर आपल्या हँडलला काही हटके नाव असावे यासाठी प्रयत्न करत असतो. कुणी आपल्या मनातील भाव त्यातून व्यक्त करतो तर कुणी आपला स्वभाव, कुणी आपली रास वापरून हँडलचे नाव सर्वांपेक्षा वेगळे कसे वाटेल यासाठी प्रयत्न करत असतो.

बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटातून तसेच गाजलेल्या वेबसिरीज मध्ये झळकलेली अभिनेत्री श्वेता त्रिपाठी हिच्या इंस्टाग्राम हँडलचे नाव देखील तिच्या भूमिकांइतकेच हटके आहे.

श्वेता त्रिपाठीच्या इंस्टाग्राम हँडलचे नाव बटाटावडा आहे. ”बटाटावडा जसा सर्वांना आवडतो तसंच माझ्या भूमिका देखील सर्वांना आवडाव्या असं मला वाटतं. जसा बटाटा ज्यात मिसळतो तो त्याची वेगळी चव तयार करतो तसंच मला देखील व्हायचं आहे. मी जी भूमिका साकारेन त्यासोबत मला तसंच एकसंध व्हायचे आहे”, असे श्वेताने एका मुलाखतीत सांगितलेले.