
एका व्यावसायिक मॉडेलला फोटोशूटसाठी बोलवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना केरळच्या कोची येथे घडली आहे. बलात्काराचा व्हिडीओ बनवून त्याआधारे तीन दिवस तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे.
पीडिता मूळची मलप्पुरम इथली आहे. तिला कुमार नावाच्या माणसाने व्यावसायिक कारणासाठी कोची इथे बोलवलं होतं. ती 1 डिसेंबर रोजी कोची इथे आली होती. तिला शीतपेयातून अंमली पदार्थ देण्यात आले.
पीडिता बेशुद्ध पडल्यानंतर तिच्यावर तीन जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्याचा व्हिडीओही बनवण्यात आला. शुद्ध आल्यानंतरही तिला तो व्हिडीओ दाखवून जवळपास दोन दिवस तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला.
या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून सलीम कुमार नावाच्या माणसाला अटक करण्यात आली आहे. तर अन्य दोन आरोपी अजमल आणि शमीर अशा दोघांचा शोध सुरू आहे.




























































