
अमेरिकेत डॉक्टरांनी डुकराची किडनी एका व्यक्तीच्या शरीरात प्रत्यारोपण केली आहे. या प्रयोग यशस्वी झाल्याने वैद्यकीय क्षेत्रातील हा चमत्कारच आहे अशी प्रतिक्रिया डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
अमेरिकेत एका व्यक्ती ब्रेन डेड झाली होती. मृत्यूपूर्वी या व्यक्तीने अवयव दान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु या व्यक्तीचे अवयव दान करता नाही येणार असे डॉक्टरांनी सांगितले. अखेर डॉक्टरांनीच यावर मार्ग काढत व्यक्तीचा मृतदेह प्रयोगासाठी वापरण्याची अनुमती मागितली. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनीही डॉक्टरांना परवानगी दिली.
त्यानुसार 25 सप्टेंबर रोजी ब्रेन डेड व्यक्तीच्या शरीरात शस्त्रक्रिया करून एका डुकराचे जेनेटिकली मॉडिफाईड किडनी प्रत्यारोपण करण्यात आली. शस्त्रक्रिये दरम्यान व्यक्तीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार डुकराचे मूत्रपिंड त्या व्यक्तीच्या शरीरात उत्तमरित्या काम करत होते. मुत्रपिंडाने शरीरातून घाण साफ करून ती शौचाच्या माध्यमातून बाहेर काढली. या मुत्रपिंडाने मनुष्याच्या शरीरातील क्रिएटिनिन अणुंचे प्रमाण कमी केले.
डुकराचे मूत्रपिंड इतर प्राण्याच्या शरीरात प्रत्यार्पण केल्यास वर्षवर तो प्राणी जगू शकतो असे यापूर्वी केलेल्या एका संशोधनात समोर आले होते. परंतु मनुष्याच्या शरीरात डुकराचे मूत्रपिंड प्रत्यार्पणाची ही पहिलीच वेळ आहे. हा प्रयोग जरी सध्या यशस्वी झाला असला तरी शस्त्रिक्रियेनंतर मूत्रपिंड किती दिवस कार्यरात असेल या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. अशाप्रकारचा मनुष्याच्याच शरीरावर प्रयोग केल्यानंतरच या प्रश्नाची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे.
पण आनंदाची गोष्ट म्हणजे एका डुकराचे मूत्रपिंड मनुष्याच्या शरीरात त्याच क्षमतेने कार्यरत होते हे या प्रयोगाने सिद्ध झाले आहे. लवकरच मेडिकल जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध होणार असून एक दोन वर्षात क्लिनिकल ट्रायलही होणार आहे.




























































