अमेरीकेतील तज्ज्ञांनी केली कमाल, मानवी शरीरामध्ये डुकराच्या किडणीचे यशस्वी प्रत्यारोपण

अमेरीकेतील डॉक्टरांच्या एका पथकाने अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवली आहे. एका ब्रेन डेड झालेल्या व्यक्तीच्या शरीरात डुकराच्या किडणीचे प्रत्यारोपण करुन जीव वाचवला आहे. प्रत्यारोपणापासून 32 दिवसांनंतर किडणी चांगले काम करत आहे. त्यांच्या या यशाचे सगळीकडून कौतुक होत आहे.

अमेरीकेच्या डॉक्टरांनी ब्रेन डेड असलेल्या व्यक्तीच्या शरीरात डुकराचे जनुक बदलून किडणीचे प्रत्यारोपण केले होते. डॉक्टरांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, डुकराची किडणी मानवी शरीरात योग्य पद्धतीने काम करायला सुरु केल्यानंतर तब्बल 61 दिवसानंतर हा प्रयोग संपवला. या यशस्वी प्रत्यारोपणानंतर डॉक्टरांच्या जोनोट्रान्सप्लान्टकडे कल वाढला आहे. कोणत्याही प्राण्याचा अवयव मानवी शरीरात प्रत्यारोपण केल्यास त्याला जोनोट्रान्सप्लान्ट बोलले जाते. अमेरीकेमध्ये 1 लाख 3 हजार हून अधिक लोकं अवयव दानाच्या प्रतिक्षेत असतात. ज्यापैकी 88 हजार लोकं किडणीच्या प्रतिक्षेत असतात. जुलै महिन्यात या प्रत्यारोपणाचे प्रमुख न्यूयॉर्क विद्यापीठ लॅंगोन ट्रान्सप्लांट इंस्टीट्यूटचे संचालक रॉबर्ट मोंटगोमरी यांनी सांगितले की, त्यांनी मागच्या दोन महिन्यात खूप विश्लेषण आणि सखोल निरीक्षण केले आणि त्यातून बरेच काही शिकायला मिळाले, त्यामुळे आता ते भविष्याबाबत फार निश्चित आहेत. सर्जन मोंटगोमरी यांचे पाचवे जोनोट्रान्सप्लान्ट होते. त्यांनी सप्टेंबर 2021 मध्ये त्यांनी जगातले पहिले जीन मोडीफाय करुन डुकराची किडणी प्रत्यारोपण केले होते.

मानवी शरीरात डुकराच्या किडणीचे प्रत्यारोपण करण्यासाठी वर्जीनियाची बायोटेक कंपनी रेविविकोरने पाळलेल्या डुकराच्या कळपातून आणले होते. जानेवारी 2022 मध्ये युनिर्व्हर्सिटी ऑफ मेरीलॅण्ड मेडीकल स्कूलचे सर्जन यांनी एका जीवंत रुग्णावर डुक्कराचे मानवी शरीरात हृदय प्रत्य़ारोपण केले होते. दोन महिन्यानंतर त्या रुग्णाचा मृत्यू झाला होता. मृत्यूचे कारण शरीरात पोर्सिन सायटोमेगालोवायरस पाहिला होता.