रेल्वेत शाकाहारी व्यक्तींसाठी हवी वेगळी सीट, उच्च न्यायालयात याचिका दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । गांधीनगर

रेल्वेत शाकाहारी आणि मांसाहारी व्यक्तींसाठी वेगवेगळ्या आसनांची व्यवस्था असावी,अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. अहमदाबाद येथे राहणाऱ्या एका वकिलाने ही याचिका दाखल केली आहे.

जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, ई. ई. सैय्यद असं या वकिलांचं नाव आहे. रेल्वेने तिकीट आरक्षण प्रक्रियेवेळी शाकाहारी आणि मांसाहारी व्यक्तींना वेगवेगळ्या आसनांची व्यवस्था करावी, या मागणीसाठी सैय्यद यांनी गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अशा प्रकारे भोजनावर आधारित आरक्षण व्यवस्था केल्याने शाकाहारी आणि मांसाहारी यांमध्ये कोणाचीही गैरसोय होणार नाही, असं सैय्यद यांचं म्हणणं आहे.

ही याचिका निव्वळ चांगल्या हेतूने केली गेली असून यात कोणाचाही राजकीय हस्तक्षेप नसल्याचंही सैय्यद यांचं म्हणणं आहे. शाकाहारी आणि मांसाहारी व्यक्तींमध्ये बऱ्याचदा वाद होतात. त्यामुळे कुणा एकाची गैरसोय ही ठरलेली असते. रेल्वेत आपल्या निवडीचे भोजन मिळणे, हा प्रत्येक प्रवाशाचा अधिकार आहे. त्यामुळे ही याचिका दाखल केल्याचं सैय्यद यांचं म्हणणं आहे. गुजरात उच्च न्यायलयात पुढील आठवड्यात या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

summary- pil for different seats for vegetarians in railway