प्लेग, पॅनिक आणि कोरोना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीलांबरी जोशी

कोरोना या साथीच्या रोगानं जगभर थैमान घातलं आहे. अशा साथींमुळे शारीरिक आणि मानसिक अशा दोन समांतर प्रक्रिया घडत असतात. अनेकांना हा अचानक झालेला बदल अस्वस्थतेकडे नेत आहे. या टप्प्यावर माणसांच्या विचारांवर, भावनांवर आणि वागणुकीवर – थोडक्यात मानसिक आरोग्यावर परिणाम होत असताना नेमके काय जपलं पाहिजे याचं विश्लेषण मांडणारा लेख.

थुसिडाईडस या ग्रीक इतिहासकारानं स्पार्टा आणि अथेन्स यांच्यातल्या यादवी युध्दाचं सविस्तर वर्णन लिहून ठेवलं होतं. त्या युध्दाच्या दरम्यान म्हणजे खिस्तपूर्व 430-426 काळात अथेन्समध्ये प्लेगनं थैमान घातलं होतं. इथिओपियामध्ये सुरु झालेला हा प्लेग इजिप्त आणि ग्रीसमध्ये पोचला. त्यानं सुमारे 1 लाख लोकांचे प्राण घेतले. थुसिडाईडसचं वैशिष्टय म्हणजे ऐतिहासिक घटनांचं वर्णन करताना त्यांचं तर्काच्या कसोटीवर विश्लेषण करणारा तो पहिलाच इतिहासकार होता. त्यानं अजून एक महत्वाचा विषय हाताळला होता. तो विषय म्हणजे यादवी युध्दाच्या, कत्तलींच्या आणि प्लेगसारख्या साथीच्या रोगाच्या काळात माणसं कशी वागतात त्याचा त्यानं अभ्यास केला होता.

नंतरच्या काळात गेल्या दोन हजार वर्षांमध्ये ब्लॅक डेथ, स्पॅनिश फ्लूपासून स्वाईन फ्लू, इबोलापर्यंत अनेक साथीचे रोग जगभर पसरले होते. या साथीच्या रोगांनी समाजात पैट पाडली, युध्दांमधली निर्णायकता ठरवली, अनेक ठिकाणच्या जमाती नष्ट केल्या हे खरं. पण याच रोगांनी वैद्यकीय विश्वातल्या अनेक शोधांना चालना दिली. समकालीन अर्थव्यवस्थेत आणि राजकीय व्यवस्थेत बदल घडवले. माणसाच्या वागण्यात आणि समाजाच्या धारणांमध्ये लक्षणीय बदल घडवले. पण या साथीच्या रोगांच्या काळात आणि त्यानंतर माणसांमध्ये व्यक्तिगत आणि सामूहिक पातळीवर कसे बदल झाले यावर मानसशास्त्रात आणि मनोविकारांच्या दुनियेत फारसं संशोधन आजतागायत झालेलं नाही.

आत्ता कोरोना या साथीच्या रोगानं जगभर थैमान घातलं आहे. अशा साथींमुळे शारीरिक आणि मानसिक अशा दोन समांतर प्रक्रिया घडत असतात. जगभरात शारिरिक पातळीवर रोगाची लागण जसजशी वाढत जाते त्या प्रमाणात माणसांच्या विचारांवर, भावनांवर आणि वागणुकीवर – थोडक्यात मानसिक आरोग्यावर परिणाम होत जातात.

करोना हा परिस्थितीनं उद्बवलेला क्रायसिस आहे. असे क्रायसिस अनपेक्षित आणि अचानकपणे येतात. अनेकांना हा अचानक झालेला बदल अस्वस्थतेकडे नेतो. एकतर कोरोना हा नवीन विषाणू असल्यामुळे सर्वत्र त्याबद्दल भीती आणि अज्ञान आहे. यामुळे लोक जास्त पॅनिक होतात. मुळात आपल्याला या नवीन रोगाची लागण होईल का? याची धास्ती प्रत्येकाच्या मनात असते. सहसा आपण ती बोलून दाखवत नाही. पण त्यामुळे मनात निर्माण होणार्या ंिचता उग्ररुप धारण करु शकतात.

या पुढचा टप्पा म्हणजे सर्व लोकांना माहिती हवी असते. मग ते ती माहिती मिळेल तिथून गोळा करतात. त्यातून अफवा, चुकीची माहिती देणार्या, अर्धवट माहिती देणार्या, गैरसमज निर्माण करणार्या आणि पैक न्यूज या प्रकारातल्या बातम्यांना पंख पैटतात. अनिश्चिततेचं थैमान लोकांच्या मनात घोंघावायला लागतं. शंकाकुशंकांचं वादळ उठतं. माध्यमं आणि माहितीची देवाणघेवाण करणार्या सर्व प्रकारांमधून मास पॅनिक या प्रकाराकडे वाटचाल सुरु होते. कोरोनाच्या निमित्तानं त्याबद्दलच्या खऱया खोटया गोष्टी आणि शंकाकुशंका यांची साथ सध्या अशीच पसरली आहे.

साथीच्या रोगांबाबत शारीरिक बाबतीत त्याचा पैलाव किती होईल यावर गणिती आकडेमोड करुन अंदाज वर्तवता येतात. पण लोकांच्या मानसिक आरोग्यावर किती परिणाम होऊ शकतो याचं मोजमाप आणि प्रिडिक्शन करता येत नाही. त्यामुळे त्यावरच्या उपाययोजनांबद्दल ठोस असं काही सांगता येत नाही. करोनावर महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे सोशल डिस्टिंन्सग. पण एवैण तुमचे सगळे कार्यक्रम रद्द झाले आहेत, कामावर जाणं बंद आहे, शाळा बंद आहे, आंतरराष्ट्रीय खेळांच्या स्पर्धा रद्द झाल्या आहेत अशा गोष्टी घडत असताना सोशल डिस्टिंन्सग जमणं सोपं नाही.

मुळात ‘घरात शांतपणे रहाणं, काही न करता स्वतःच्या मनाशी संवाद साधणं’ असं काही ‘असतं’ हे आपण विसरुन गेलो आहोत. वर्वै प्रॉम होम हा प्रकार ज्यांना अवगत आहे त्यांना आणि अंतर्मुख प्रवृत्तीच्या माणसांना सोशल डिस्टिंन्सगमुळे मानसिक समस्या फारशा भेडसावणार नाहीत. त्यांना शांततेत घरात राहून वाचन, चित्रपट पहाणं, छंद जोपासणं हे सहज जमेल. पण ज्यांना बाहेर फिरुन, माणसांमध्ये मिसळून उर्जा मिळते त्या बहिर्मुख प्रवृत्तीच्या माणसांना सोशल डिस्टिंन्सग हे भयंकर संकट वाटू शकतं. काहीजणांना लक्ष दुसरीकडे वळवायला कोणी नाही म्हणून त्यांचा सुरुवातीला कामाचा झपाटा वाढेल. पण नंतरच्या टप्प्यात मात्र एकटं वाटायला लागेल.

कोरोनाची समस्या वाढत गेली तर काही लोकांमध्ये शांत झोप न लागणं, कशातच लक्ष न लागणं, सतत राग/ंिचता/काळजी वाटणं आणि पॅनिक होणं, आपल्या आरोग्याबद्दल अतिकाळजी वाटायला लागणं, असहाय्य वाटणं, ज्यांना खोकला झाला असेल त्यांची अक्षरशः भीती वाटणं आणि समाजापासून दुरावल्यासारखं वाटणं ही लक्षणं दिसायला लागतील.

यावरचा पहिला उपाय म्हणजे विश्वासार्ह वाटणार्या टीव्ही चॅनेल्स/वेबसाईटसवरुनच माहिती मिळवा. समाजमाध्यमांमधून मिळणारी माहिती आणि लेख यावर चटकन विश्वास ठेवू नका. आत्ताच्या काळात माणसं पॅनिक होण्यामागे माध्यमांचा मोठा हात असतो. 2256 लोकांच्या एका सर्वेक्षणात माध्यमांमधल्या मेडिकल आणि आरोग्यविषयक बातम्या खूप प्रभावी ठरतात असं दिसून आलं होतं. त्या बातम्या वाचणारे निम्मे लोक तरी आपल्या आरोग्याबाबत सजग होऊन काळजी घ्यायला लागतात. त्यामुळे प्रसिध्दीमाध्यमांनी आणि सामाजिक माध्यमांनी बातमी देताना/शेअर करताना कोरोनाच्या आत्ताच्या काळात खूप सावधपणा बाळगायला हवा.

तसंच सतत बातम्या पाहू नका. दिवसभरात बातम्या किती वेळ पहायच्या याचं वेळापत्रक ठरवा. मुळात भयावह बातम्या ऐवैन भीतीत विनाकारण भर पडते. याचं महत्वाचं कारण म्हणजे, भावनिक समवेदना. म्हणजे काय ते पाहू. आपल्या टोप्या माकडांकडून परत मिळवण्यासाठी स्वतःच्या डोक्यावरची टोपी जमिनीवर आपटणारा टोपीवाला सगळ्यांनाच माहिती असतो. दुसऱयानं केलेल्या शारीरिक कृतीची ती नक्कल झाली. पण भावनिक पातळीवर आपण सर्वजण दुसऱयांच्या मूडसप्रमाणे बदलत असतोच.

आा@फिसमध्ये सगळेजण मिटींगमध्ये शांतपणे, विचारपूर्वक, आनंदानं नवीन योजना आखत असताना एक मूड असतो. पण तिथे नुकताच आलेला टीम मेंबर जर दुःखी ंिकवा अस्वस्थ असेल तर टीमचा मूड बदलायला वेळ लागत नाही. तसंच सतत भीती पसरवणाऱया बातम्या पाहिल्यामुळे त्या भावनांचा परिणाम आपल्यावर होतो. त्यानंतर तर्वैनिष्ठ विचार मनात येऊ शकत नाहीत. इतर उपाय म्हणजे, ताण कमी करण्यासाठी मोबाईलवर मित्रांशी/नातेवाईकांशी बोला. पण पॅनिक होऊन दिवसभर बोलत बसू नका.

फोनवर लोकांशी बोलताना कोरोनाव्हायरस सोडून इतर विषयांवरही बोलायला सुरुवात करा. तुमच्याजवळच्या प्रत्येकाला कोरोनाची लागण झाली आहे अशा प्रकारे वागू नका. काळजी कशा प्रकारे घेता येईल तेवढाच विचार करुन काळजी करण्यापेक्षा काळजी घ्या.

घरी असतानाही दैनंदिन कामं वेळच्या वेळी करा. शेडयुल सांभाळा. जेवणाच्या, झोपेच्या वेळा बदलू नका. तुम्हाला आनंद वाटतो अशा गोष्टी करा. पुस्तक वाचणं, घरच्यांबरोबर पत्ते, वैरम खेळणं, मित्रमैत्रिणी/नातेवाईक यांच्याबरोबर व्हिडिओ कॉलवरुन गप्पा मारणं, चित्रं काढणं, वाद्यं वाजवणं, संगीत ऐकणं, झाडांना पाणी घालणं, नवीन पदार्थ करायला शिकणं, नवीन भाषा शिकणं, अशा अनेक गोष्टी करता येऊ शकतील. टीव्ही/नेटफ्लिक्सवर आवडते चित्रपट पहाणं हा पर्यायही उपलब्ध आहे. पण त्यावर मर्यादा हवी.

ध्यानधारणा आणि योगासनं यातून मनातली धास्ती कमी व्हायला, लक्ष एकाग्र व्हायला मदत होईल. मुख्य म्हणजे, इतवैं करुनही ंिचता, नैराश्य, नकारात्मक विचार सतावत असतील तर फोनवरुन समुपदेशकाचा किंवा मानसोपचारततज्ञाचा सल्ला जरुर घ्या. सार्या जगासमोरच कोरोनाचं संकट आहे. हम अकेले नहीं हैं हे लक्षात घ्या.

(लेखिका मानसिक आरोग्य समुपदेशक आहेत)
[email protected]