प्लॅटफॉर्म तिकीट 50 रुपये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वे मंत्रालयाने प्लॅटफॉर्म तिकिटांच्या दरात घसघशीत वाढ केली आहे. मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या टर्मिनसचे प्लॅटफॉर्म तिकीट आता दहा रुपयांवरून थेट पन्नास रुपये करण्यात आले आहेत. स्थानकांवरील गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 24 फेब्रुवारीपासून हे दर लागू झाले असून 15 जूनपर्यंत ते कायम राहणार आहेत.

लांब पल्ल्याच्या टर्मिनसवर प्रत्यक्षात प्रवास करणारे कमी आणि त्याला सोडायला येणाऱयांची अधिक गर्दी असते. त्यामुळे प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर वाढविण्याचे धोरण रेल्वे बोर्डाने आखले आहे.

जास्त तिकीट दर केल्याने स्थानकांवर विनाकारण येणाऱयांची संख्या कमी करण्याचा यामागे हेतू आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर पन्नास रुपये इतके करण्यात आले आहेत. उन्हाळी सुट्टय़ांमध्ये प्रमाणाच्या बाहेर गर्दी होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्प अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.

या स्थानकांचे प्लॅटफॉर्म तिकीट दर वाढले

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस तसेच ठाणे, कल्याण, पनवेल आणि भिवंडी रोड स्थानकांच्या प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर प्रत्येकी पन्नास रुपये करण्यात आले आहेत.