अलवर घटनेवर ‘पुरस्कार वापसी’ गँग गप्प का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या मुद्दय़ावरून अनेक साहित्यिकांनी ‘पुरस्कार वापसी’ केली होती. राजस्थानमधील अलवर येथे घडलेल्या सामूहिक बलात्कारकांड प्रकरणाबाबत ‘पुरस्कार वापसी’ गँग गप्प का, असा प्रश्न करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुद्धिवादी वर्गावर निशाणा साधला.

गाझीपूर येथे झालेल्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदी यांनी राजस्थानमधील अलवर येथे घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाकडे लक्ष वेधले. पाच वर्षांत आमच्या सरकारने महिलांना मानसन्मान, आदर दिला. बलात्कारासारख्या गंभीर गुह्यांसाठी कायद्यात फाशीची तरतूद केली. मात्र महिला सुरक्षेसाठी काँग्रेस नेमके काय करत आहे हे राजस्थानमधील घटनेमुळे देशाने पाहिले असे सांगत काँग्रेस सरकारला लक्ष्य केले.