#HappyBdayPMModi मोदींचे कधीही पाहिले नसतील असे दुर्मीळ फोटो

2069


हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 69 वा वाढदिवस आहे. उत्तर गुजरातच्या वडनगरमध्ये 17 सप्टेंबर 1950 ला त्यांचा जन्म झाला. मोदींनी राज्यशास्त्रात पदवीचे शिक्षण घेतले आहे. लहानपणापासूनच ते संघामध्ये जायचे त्यामुळे त्यांच्यावर संघाचा जास्त प्रभाव दिसून येतो. गुजरातमध्ये आसएसएसनेही चांगलेच पाय रोवलेले होते. याच दरम्यान नरेंद्र मोदी हे 1967 मध्ये संघाशी जोडले गेले. यावेळी त्यांचे वय अवघे 17 वर्षे होते. यावर्षी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्यत्व घेतले.

#HappyBdayPMModi वाढदिवसानिमित्त मोदी आईच्या भेटीला

1968 ते 1988 या काळात नरेंद्र मोदी संन्यासी म्हणून हिमालयामध्ये फिरत होते. संघाचे प्रचारक म्हणून ते मंदिरामध्येच आसरा घ्यायचे. त्यांचा हा प्रवास अत्यंत खडतर असा होता. याच दरम्यान 1974 मध्ये झालेल्या नव निर्माण आंदोलनात ते सहभागी झाले. सक्रीय राजकारणात येण्यापूर्वी ते अनेक वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. गुजरातमधल्या छोट्या गावातून आलेला हा तरुण देश फिरून लोकांशी संपर्क वाढवत होता. 2001 पासून मोदींकडे गुजरातचा कारभार देण्यात आला.

modi12

2001 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हा देखील नरेंद्र मोदी आपल्या घराच्या गच्चीवर झोपत असत. त्याबद्दल कुणालाही याची कल्पना नव्हती.गांधीनगरमधील अक्षरधाम मंदिरावर 24 सप्टेंबर 2002 रोजी दहशतवादी हल्ला झाला. तेव्हा 29 लोक ठार झाले. त्यावेळी अधिकाऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार नरेंद्र मोदी यांनी गच्चीवर झोपणं बंद केले.

modi6

2001 पासून सलग 13 वर्षे मोदी गुजरातचे मुख्यमंत्री राहिले. 20104 ला केंद्रीय राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली एनडीएने सत्त मिळवली आणि मोदी पंतप्रधान झाले. 2019 ला सलग दुसऱ्यांदा बहुमत मिळवत मोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदींचे वडील दामोदरदास हे चहा विकायचे. चायवाला ते लोकप्रिय पंतप्रधान असा नरेंद्र मोदींचा प्रवास खडतर, आव्हानात्मक ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे काही दुर्मिळ फोटो –

आपली प्रतिक्रिया द्या