शहरी नक्षलवाद्यांना काँग्रेसचा पाठिंबा का?, मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
modi-in-mumbai-e
फाईल फोटो

सामना ऑनलाईन । जगदलपूर

शहरी नक्षलवादी हे एसी खोलीत बसतात, त्यांची मुलं परदेशात शिक्षण घेतात. पण ते रिमोट कंट्रोलद्वारे आदिवासी भागातील तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत. अशा शहरी नक्षलवाद्यांना काँग्रेस का पाठिंबा देत आहे, असा संतप्त सवाल करीत पत्रकाराची हत्या करणाऱया नक्षलवाद्यांना काँग्रेस नेते क्रांतिकारी म्हणतात, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. भाजप हा कोण्याच्या कृपादृष्टीवर चालणारा पक्ष नाही. देशातील सवाशे कोटी जनताच भाजपसाठी हायकमांड आहे, असे सांगत त्यांनी काँग्रेसला चिमटा काढला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी बस्तरमधील जगदलपूर येथे प्रचार सभा घेतली. या प्रचार सभेत त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवत शहरी नक्षलवादावरून त्यांना फटकारले. मोदी म्हणाले, काँग्रेसनेही शहरी नक्षलवादावर उत्तर दिले पाहिजे. शहरी नक्षलवाद्यांवर कारवाई केल्यावर काँग्रेस त्यांच्या समर्थनासाठी मैदानात का उतरते, असा सवालही मोदी यांनी केला. दूरदर्शनचा पत्रकार कॅमेरा घेऊन आला होता. या पत्रकाराची नक्षलींनी हत्या केली आणि अशा नक्षलींना काँग्रेस नेते क्रांतिकारी म्हणतात ही कोणती विचारधारा आहे, असा सवाल त्यांनी काँग्रेसला विचारला.